आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:प्रेम प्रकरणातून पंढरपूरच्या अभियंत्याची पैठणमध्ये आत्महत्या

पंढरपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमप्रकरणातून येथील निखिल चांडोले (वय २४) या अभियंता युवकाने रविवारी रात्री पैठण (जि. औरंगाबाद) येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. तो निवृत्त नायब तहसीलदार दत्तात्रय चांडोले (रा. विजापूर गल्ली) यांचा एकुलता एक मुलगा होता. निखिल हा पैठण येथे शिक्षण घेतानाच नोकरी करीत होता. रविवारी दिवसपाळी करून तो खोलीवर आला होता. मध्यरात्री त्याने खोलीतील पंख्याला गळफास घेतला. सकाळी त्याचा मित्र खोलीवर आल्यावर ही घटना उघडकीस आली. त्याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. निखिल अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. तसेच पैठण एमआयडीसीतील एका कंपनीत अभियंता म्हणून तो नोकरी करत होता. त्यामुळे सध्या तो पिंपळवाडी येथील आदर्शनगरमध्ये राहत होता.

प्रेमपत्र सापडले : निखिल याच्याकडे प्रेमपत्रे सापडली आहेत. पोलिसांनी सर्व पत्रे ताब्यात घेतली आहेत. तसेच नातेवाईक आल्यानंतर त्याने का आत्महत्या केली? कोणाशी त्याचे प्रेमसंबंध होते का ? या प्रश्नांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...