आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:कोरोना काळात एका अनोख्या लग्नाची गोष्ट... ना वऱ्हाड नाबँडबाजा, पंढरपूरची नवरी मुलगी एकटीच गेली थेट अमेरिकेला

पंढरपूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिशिगनमधील मंदिरात मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत पडल्या अक्षता

ही गोष्ट आहे वाडीकुरोली (ता.पंढरपूर ) येथील मूळ रहिवासी व सध्या नोकरीनिमित्त हडपसर (पुणे) येथे वास्तव्यास असलेल्या उत्तम जालिंदर कुंभार यांची कन्या स्मिता आणि कोल्हापूरचे रहिवासी नागेश अण्णासाहेब कुंभार यांचे चिरंजीव अभिषेक यांच्या सातासमुद्रापार पार पडलेल्या एका अनोख्या विवाह सोहळ्याची. या विवाहाचे वैशिष्ट्य असे की, ना बँडबाजा होता ना वऱ्हाडी, व्हिसा नियमामुळे नवरी मुलगी एकटीच गेली अमेरिकेला आणि तेथील मंदिरात पडल्या अक्षता... अभिषेक अमेरिकेत स्थायिक आहेत. कोरोना काळातच ऑनलाइन पद्धतीने वधू आणि वराने एकमेकांना पसंत केले. विवाह निश्चित झाला. कोरोना संकट सरले की लग्नाचा बार उडवायचे ठरले. परंतु, लग्न ठरून नऊ महिने उलटले तरी कोरोना थांबेना अन् विवाहाचा मुहूर्त ठरेना, अशी स्थिती निर्माण झाली.

बस्ता बांधण्याची तयारी, लग्नापूर्वीच्या विधींची तयारी, त्यात उडणारी धांदल... दोन्हीकडील कुटुंबीयांची जोरदार तयारी सुरू होती. पण, कोरोना वाढला आणि एकट्या वधूलाच अमेरिकेला जाण्याचा व्हिसा मिळाला. मग, ऑनलाइन पद्धतीने कुटुंबाच्या उपस्थितीत १७ एप्रिल २०२१ रोजी अमेरिकेतील मिशिगन शहरातील वेंकटेश्वरा मंदिरात हा लग्न सोहळा साजरा झाला. या विवाह सोहळ्यासाठी वधूवरांकडील नातेवाईक मंडळी उपस्थित राहू शकली नाहीत. मात्र अभिषेकचे मित्र, मैत्रिणी अशी केवळ पंचवीस मंडळी या विवाह सोहळ्यास उपस्थित होती.

ऑनलाइन अक्षता आणि आशीर्वादही
ना लग्नपत्रिका ना निमंत्रणे. मग सोशल मीडियातूनच आप्तेष्टांना निरोप पोहोचले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनच पाहुणे मंडळींनी वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. सातासमुद्रापार झालेला हा अनोखा विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

बातम्या आणखी आहेत...