आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारकरी संप्रदायाचा विरोध:पंढरपूर विकासाला नव्हे विनाशाला विरोध

पंढरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉरच्या विरोधात शेकडो वारकऱ्यांसह महाराज मंडळींनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रदक्षिणा मारून विरोध दर्शविला. यावेळी महाराज मंडळींनी ‘आमचा विकासाला विरोध नसून विनाशाला विरोध’ असल्याचे सांगितले.

कॉरिडॉरला स्थानिक व्यापारी, रहिवासी, फडकरी, दिंडी प्रमुख व महाराज मंडळींनी विरोध दर्शविला आहे. शासनाने प्रस्तावित कॉरिडॉर रद्द करावा, या मागणीसाठी सोमवार व्दादशी मंदिर परिसरात भजन आंदोलन केले. कॉरिडॉरला विरोध का यबतची माहिती पत्रके देखील वाटण्यात येत होती. तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी निवेदन स्वीकारले.

वाळवंटात बंदीकडे रोख
वारकरी पाईक संघाचे अध्यक्ष राणा महाराज वासकर यांनी वारकऱ्यांना विश्वासात न घेता हा आराखडा बनविण्यात आल्यामुळे निषेध करीत असल्याचे सांगितले. विष्णू महाराज कबीर यांनी यापूर्वी चंद्रभागेच्या वाळवंटात वारकरी, भजन कीर्तन करीत होते. न्यायालयाच्या निर्णयाच्या नावाखाली वारकऱ्याना वाळवंटात राहण्यास बंदी करण्यात आली, अशी टीका करण्यात आली. त्यांचा रोख वाळवंट बंदीकडे होता.

बातम्या आणखी आहेत...