आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतेवर भर:कोरोनाचा प्रभाव हळुहळू वाढतोय, पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला जाताना हे नियम पाळा, मंदिर प्रशासनाकडून उपाययोजना

पंढरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहीत फोटो. - Divya Marathi
संग्रहीत फोटो.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या हळुहळू वाढत असून त्यामुळे सुरक्षात्मक पाऊले उचलली जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यापार्श्वभुमीवर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्कचा वापर करावा असे आवाहन केले आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय

कोरोनाची चौथी लाट येऊ शकते असे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. मागील तीन चार दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. राज्यातील सातारा आणि सांगली जिल्ह्यात शासकीय कार्यालयांत मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसेच सार्वजिनिक ठिकाणी नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मंदिर समिती कार्यकारी अधिकाऱ्यांचे आवाहन

तीर्थक्षेत्र पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. शहर व तालुक्यात कोरोनाचे चार रुग्ण आढळून आली असून वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मंदिरात येताना मास्कचा जरुर वापर करावा असे आवाहन समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले आहे.

मास्क वापरा

राज्य शासनाकडून मंदिरात मास्क सक्ती करण्याच्या कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नाहीत. तरीही खबरदारी म्हणून भाविकांना मास्कचा वापर करावा असे आवाहन केले आहे. मंदिरातील भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करता, मंदिर व परिसरातील स्वच्छतेवर अधिक भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गाभारा, सभामंडप स्वच्छ ठेवण्याच्या सूचना

दिवसातून तीन ते चार वेळा देवाचा गाभारा व मंदिरातील दोन्ही सभामंडप स्वच्छ ठेवण्याच्या सूचनाही संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. मंदिरात येताना स्वच्छतेबरोबरच सामाजिक अंतर ठेवून दर्शन घ्यावे असे आवाहनही मंदिर समितीने केले आहे.