आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक:'तीन तारखेची वाट पाहू, फडणवीसांवर आताच अविश्वास दाखवणे योग्य नाही'; जयंत पाटलांचे मोठे विधान

पंढरपूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक येत्या 17 एप्रिलला होत आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 17 एप्रिलला मतदान होणार आहे. या जागेसाठी राष्ट्रवादीने भारत भालके यांचे सुपूत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपकडून समाधान आवताडे उमेदवार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी दोन्ही उमेदवारांचे अर्ज आज दाखल करण्यात आले. त्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पंढरपुरात उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा तनपुरे मठात मेळावा झाला. त्या मेळाव्यात जयंत पाटील यांनी संबोधन केले. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, 'देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार देणार नसल्याचे म्हटले होते. आपण तीन तारखेपर्यंत वाट पाहू, फडणवीसांवर आताच अविश्वास दाखवणे योग्य होणार नाही.' जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तीन एप्रिलला अर्ज मागे घेण्याची तारीख असल्यामुळे भाजपकडून अर्ज मागे घेतला जातो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

बातम्या आणखी आहेत...