आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरमपूज्य श्री गुरुनाथबाबा दंडवते महाराज मठ व संगीत विकास सभा यांच्या संयुक्त विद्यमाने जुना एम्प्लॉयमेंट चौकातील दंडवते महाराज मठात दोन दिवसीय पंडित गजाननबुवा जोशी संगीत महोत्सव स्वर यज्ञाचा समारोप झाला. रविवारी या कार्यक्रमात देवश्री दंडवते, शर्वरी पुरोहित, वृषाली काटकर, मृदुल अडावदकर, रमा कुलकर्णी, पवन नाईक, परिमल कोल्हटकर यांचे गायन, तर ऋषिकेश सुरवसे यांचे तबला सोलो वादन झाले. समारोपप्रसंगी राग भैरव, अल्हीया बिलावल, कोमल वृषभ असावरी, मुलतानी, गौड मल्हार, धनश्री या रागाचे गायन झाले. शशांक कट्टी यांनी शुध्द सारंग हा राग वाजवला.
त्यांना संगीताची साथ आनंद बदामीकर यांनी दिली. गुरू पंडित विकास कशाळकर यांच्या बहारदार राग प्रदीपकी, राग नटबिहाग, खुल खुल जाए या ठुमरीने कार्यक्रमाची सांगता झाली. दंडवते मठातर्फे दंडवते महाराज व त्यांच्या सुविद्य पत्नी रुक्मिणी दंडवते यांच्याकडून डॉ. विकास कशाळकर व डॉ. राजश्री कशाळकर यांच्या सत्कार केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.