आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरातील बाळे शिक्षक पतसंस्थेच्या निवडणूक:माजी आमदार दत्तात्रय सावंतांचे पॅनल मोठ्या फरकाने विजयी

सोलापूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या सेवाभावी कृती पॅनलचे सर्व उमेदवार 900मतांच्या फरकाने विजयी झाले असून पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व दत्तात्रय सावंत यांनी सिध्द केले आहे.

गतपंचवार्षिक निवडणुकीत ही आ सावंत यांचे सर्व उमेदवार 700मतांच्या फरकाने विजयी झाले होते, यावेळी महिला प्रवर्गातील पाटील विद्या व पांगल सुप्रिया या दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाल्या होत्या. इतर मागास प्रवर्गातील सेवाभावी पॅनल च्या माळी राजेंद्र यांना 1713 तर विरोधी उमेदवार अडसूळ बाळासाहेब 731 मते मिळाली , वी ज भ ज प्रवर्गातील सेवाभावी चे अलदर नामदेव यांना1632 तर विरोधी उमेदवार वाघमोडे दादासो 753 मते मिळाली अ जा प्रवर्ग मधील सेवाभावी चे शिंदे शिवाजी यांना 1633 तर बनसोडे धनाजी यांना 810 मते मिळाली.

सर्व साधारण प्रवर्गातील सेवाभावी पॅनलचे कदम दत्तात्रय(1667), काटकर तात्यासाहेब(1632), गायकवाड मारुती (1596), गुंड सुरेश(1609), घाडगे समाधान (1601), चव्हाण संभाजी(1633), थिटे शिवाजी(1531), देशमुख कैलास (1610), भीमनवरू सुभाष(1569), मोहोळकर नवनाथ(1578), रजपूत जवानसिंग (1492) मते मिळवून विजयी झाले.

शिक्षकांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने 1977 मध्ये स्थापन झालेली शिक्षक पतसंस्था सुरुवातीला अतिशय उत्तम चालू होती परंतु मध्यंतरी काही गुंडगिरी वृत्तीच्या व्यक्तीमुळे पतसंस्थेच्या सचिवांच्या खूना पर्यंत मजल गेल्याने तसेच भ्रष्टाचार या कारणाने चर्चेत आली होती परंतु 2015 मध्ये आ.दत्तात्रय सावंत हे पुणे विभागीय शिक्षक आमदार म्हणून निवडून आल्यानंतर या संस्थेच्या सभासदांनी दत्तात्रय सावंत हे सभासद नसताना सुद्धा आग्रहाने पॅनल उभा करण्यासाठी विनंती केली त्याप्रमाणे आमदार सावंत यांनी पॅनल उभा करून विजय मिळवून सत्ता स्थापन केली, त्यांनी कर्जात अडकलेल्या पतसंस्थेस स्वभांडवलावर आणले तसेच व्याजदर 14टक्केवरून 8टक्केवर आणला.संजीवनी निधी योजनेमुळे मयत सभासदांच्या कुटुंबातील व्यक्तीला 12लाख रुपयांचे साहाय्य मिळू लागले व जमीनदारांना ही दिलासा मिळाला त्यामुळे सभासदांनी पुन्हा एकदा मा आ दत्तात्रय सावंत यांच्या वर विश्वास व्यक्त केला.

शिक्षकांना अधिक सुविधा देणार - सावंत

नूतन संचालक पतसंस्थेच्या पैशातून नव्हे तर स्वतः च्या खिशातून पैसे खर्च करून पतसंस्थेचा कारभार करतील. आधुनिक काळात शिक्षकांचा पैसा सुरक्षित ठेऊन आधिक चांगल्या सुविधा सभासदांना देण्याचा प्रयत्न नूतन संचालक मंडळ करेल असा विश्वास सेवाभावी कृती पॅनलचे प्रमुख माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केला

बातम्या आणखी आहेत...