आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अवघ्या 9 वर्षांच्या पार्थ आळंदची संगणकीय कोडिंग भाषा पायथनवर कमांड, पदवीच्या विद्यार्थ्यांसमोर दिले व्याख्यान; आयआयटीच्या मुलांसमवेत पूर्ण केली कार्यशाळा, धैर्यशील मोहितेने ५ हजार बक्षीस देऊन

सोलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूरचा पार्थ आळंद. वय अवघे नऊ वर्षे. पण स्वत:च गुगलद्वारे संगणकीय भाषा आत्मसात करून त्याने चक्क कोडिंग भाषा पायथनवर उत्तम कमांड बसवली. अकलूजच्या ग्रीन फिंगर्स महाविद्यालयात मशीन लर्निंग या विषयावर त्याने नुकतेच व्याख्यान दिले. धैर्यशील मोहिते यांनी या कौतुकास्पद कामगिरीबद्दल पाच हजार रुपये देऊन सत्कारही केला.

इतक्या लहान वयात पदवीच्या अभ्यासक्रमातील संगणकीय विषयात पारंगत होणे, हेच आगळेपण आहे. सध्या तो फेस डिटेक्शन व डाटा यावर अध्ययन करीत आहे. कॅगल व गिटहब या ओपन सोर्सद्वारे डाटा मिळू शकतो. त्यावरून विविध विश्लेषण, आलेख यातून माहितीवर काम करत आहे. इतकेच नाही तर आयआयटी खरगपूर, रूरकीने आयोजित केलेल्या संगणकीय कार्यशाळेत यशस्वी सहभागही घेतला. या कार्यशाळेत डेटा सायन्स, मशिन लर्निंग, आर्टिफिशरी इंटलिजन्स, नॅचरल लॅग्वेजज प्रोसेसिंग या विषयावर सखोल अध्ययन करतो आहे.

यात सहभागी होण्यापूर्वी पार्थची आयआयटी संचालकांनी खास मुलाखत घेतली. रेझ्युम पाहिला. त्याचे अस्खलित इंग्रजी संभाषण, संगणकीय भाषेतील सखोल ज्ञान पाहून प्रभावित झाल्याने त्यास आयआयटीची कार्यशाळा पूर्ण करता आली. पायथन ही संगणकीय प्रोग्रामिंग भाषा आहे. जावा स्क्रिप्ट, सी प्लस प्लस, काेटलिन या काही प्राेग्र्रामिंग भाषा आहेत. यात पायथन सर्वात प्रगत आहे. याचा उपयाेग करून वेब डेव्हलपमेंटपासून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट तसेच अॅप्लिकेशनही तयार करता येते.

बातम्या आणखी आहेत...