आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे येथील सिम्बॉयोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी येथील वाय - २० आंतरराष्ट्रीय परिषदेत संगमेश्वर स्वायत्त महाविद्यालयातील एम. ए २ ची श्रेया माशाळ व बी. कॉम. २ अमेय पटवर्धनने सहभाग घेत व सोलापूरचे प्रतिनिधित्व केले. पुणे येथील वाय २० या आंतरराष्ट्रीय परिषद आयोजिली होती. यात देश विदेशातील विद्वान वक्ता व विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन विविध विषयांवरील मंथन केले. पर्यावरण बदल, शिक्षणातील अद्ययावत बदल, जेंडर रिलेटेड कॉन्फ्लिक्ट्स, विकासात्मक राजकीय धाेरण, औद्योगिक कामपद्धतीतील बदल आदी विषयांवर गटचर्चा झाली. वाय २० साठी महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील एक कॉलेजची निवड करण्यात आलेली होती. सोलापूर जिल्ह्यातून संगमेश्वर कॉलेजला हा मान मिळालेला होता.
भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या उपक्रमांतर्गत वाय- २० आंतरराष्ट्रीय परिषद झाली. केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा मंत्रालय, महाराष्ट्र् शासनाचा उच्च शिक्षण विभाग आणि सिम्बॉयोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद घेण्यात आली. भारताचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर व भूतानचे केंद्रीय मंत्री उगयेन दोरजी यांच्या सोबतच डॉ. बाला रमाणी, लोबझान्ग्वांगटक, प्रियदर्शन सहस्त्रबुध्दे, लिंडसीव्हाइटहेड, सायमन कुआनी, डॉ. एस.बी.मजुमदार, सोफिया बरमुडेझ, युलिसेसब्रेंगी, डॉ. संदीप वासलेकर, विश्वासनांगरे -पाटील, सना वैद्य्, त्रिशा शेट्टी,रोनेले किंग, राजेश श्रीवास्त्व, कॅरीमोटओडबॉडे, अलर्ब्ट लॅनॉन्ग्, प्रवीणनिकम, डॉ. रेणू राज, कैरवी खिमजी, डॉ.विश्वजित मोहपात्र, निखिल मल्होत्रा,आकाशदीप मकर या विषयतज्ञांनी यापरिषदेमध्ये मार्गदर्शन केले.
यत विविध स्पर्धा घेतल्या. त्यामधून एम.ए. भाग 2 इंग्रजी विषयाची विद्यार्थिनी श्रेया माशाळआणि बी. कॉम. भाग २ चा विद्यार्थीअमय पटवर्धन यांची निवड झाली. त्यांनीपुणे येथे होणाऱ्या परिषदेत सहभागघेतला. उपक्रमासाठी संस्थेचे सचिवधर्मराज काडादी, प्राचार्य डॉ. राजेंद्र् देसाईयांनी मार्गदर्शन केले. तर नोडलआफिसर प्रा.अर्जुन चौधरी आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.