आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाविन्यपूर्ण उपक्रम:प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरावर लावणार पक्षाचा झेंडा, राष्ट्रवादीचा शुक्रवारी 23 वा वर्धापन दिन

सोलापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचा 23 व्या वर्धापन शुक्रवारी (दि. 10) जून रोजी आहे. या निमित्ताने सोलापूर शहर राष्ट्रवादीच्यावतीने राष्ट्रवादी ध्वजारोहण, शहरातील घरोघरी जाऊन राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार, व्याख्यानमाला तसेच केंद्र सरकारच्या विरोधात पण पथनाट्य सादर करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष भारत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पक्षाच्यावतीने यूट्यूब चैनल लवकरच काढण्यात येणार आहे. तसेच महापालिकेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त तरुणांना राष्ट्रवादी पक्षात सामील करून घेण्यात येणार आहे. तरुणांना बूथ नियोजनासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही यावेळी शहराध्याक्ष जाधव यांनी दिली.

क्रियाशील सभासदांची नोंदणी

सोलापूर शहरात राष्ट्रवादीमध्ये 18 हजार क्रियाशील सभासदांची नोंदणी झाली असून याचे उद्दिष्ट 40 हजार ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट येत्या काही दिवसात पूर्ण करण्यात येणार आहेत. सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादीचे फक्त 4 नगरसेवक निवडून आले होते. परंतु आता राष्ट्रवादीच्या संपर्कात 23 नगरसेवक असून येणार्‍या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील अशी अपेक्षा आहे. पत्रकार परिषदेस माजी महापौर महेश कोठे, कार्याध्यक्ष संतोष पवार, दिलीप कोल्हे, सुनीता रोटे, तोफिक शेख, सुधीर खरटमल, जुबेर बागवान आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...