आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:कर्नाटक परिवहनच्या बसगाड्यांसाठी प्रवाशांची उडतेय झुंबड, नियोजनाअभावी शासकीय दूध डेअरी परिसरात कोंडी

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसगाड्यांमुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना दिलासा मिळत असल्याचे चित्र सात रस्ता येथील शासकीय दूध डेअरीजवळ पाहायला मिळत आहे. येथे प्रवाशांची मोठी गर्दी असते. जणू कर्नाटक परिवहन मंडळाने बसडेपो केल्यासारखेच चित्र आहे.

कर्नाटकच्या गाड्यांमुळे प्रवाशांची सोय होत आहे. दक्षिण सोलापूरच्या सीना-भीमा नद्यांच्या खोऱ्यातील गावाकडे जाणाऱ्या एसटी बस गाड्यांना थांबण्यासाठी जागा नाही. अशातच एकापाठोपाठ चार ते पाच बसगाड्या उभ्या असतात. परिणामी, त्या भागात वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. बसमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवाशांना बसगाड्यांमागे पळत जावे लागते. यातून छोट्या-मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच, कर्नाटकातून येणाऱ्या गाड्या शासकीय विश्रामगृह येथे थांबताच प्रवासी घेण्यासाठी रिक्षांची बेशिस्त गर्दी होते. यातून वाहतुकीची कोंडी होत आहे.

कर्नाटकच्या बसगाड्या एक-सलग उभारण्याऐवजी ठरावीक अंतराने सोडण्याची सूचना करू. तसेच, खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्यात येईल. विश्वनाथ सिद, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक

बातम्या आणखी आहेत...