आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी सुरू‎:पतंगराव खून प्रकरण: आणखी‎ कोणाचा सहभाग

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलीच्या घटस्फोटाच्या‎ कारणावरून सासरच्या सासरकडील‎ तिघांनी मिळून नितीन अनिल पतंगराव (‎ वय २७, हुच्चेश्वरनगर कुमठा नाका )‎ यांचा खून झाला होता. याप्रकरणी‎ तिघांना अटक झाली असून आणखी‎ कोणाचा यात सहभाग आहे का याची‎ चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस‎ निरीक्षक राजन माने यांनी दिली.‎ सचिन पतंगराव यांनी एमआयडीसी‎ पोलिसात फिर्याद दिली आहे. हवालदार‎ महेश शेजेराव, हर्षवर्धन शेजेराव,‎ श्रीकांत कोळी ( सोलापूर) यांच्यासह‎ चार ते पाच जणांवर एमआयडीसी‎ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.‎

शनिवारी रात्री हा प्रकार घडला होता.‎ सासरा महेश शेजेराव ,‌ त्याचा मुलगा‎ हर्षवर्धन, भाचा कोळी या तिघांनी मिळून‎ मारहाण केल्यामुळे नितीन पतंगराव‎ यांचा मृत्यू झाला.‎ शेजेराव यांच्या मुलीसोबत नितीनचा‎ विवाह झाला होता. कौटुंबिक कलहामुळे‎ न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज‎ दाखला होता. त्याचा अंतिम निकालही‎ लवकरच होणार होता. त्यापूर्वीच हा‎ प्रकार घडला. पोलीस निरीक्षक माने‎ म्हणाले, याबाबत आणखी कुणाचा‎ सहभाग आहे का, नेमकी घटनाची‎ पडताळणी सुरू आहे असे त्यांनी‎ सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...