आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशा पल्लवित:आदिनाथ साखर कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू होण्याचा मार्ग मोकळा

करमाळा / विशाल घोलप3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदिनाथ सहकारी साखर कारखाना चार महिन्यांत सुरू करण्याचा शब्द प्रा. तानाजी सावंत यांनी दिला होता. त्यांनी मंत्रिपद मिळाल्यानंतर महिनाभरात आठ कोटी ७५ लाख रुपये राज्य सहकारी बँकेकडे भरले आहेत, अशी माहिती माजी आमदार नारायण पाटील व कारखाना अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी दिली. त्यामुळे कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रा. तानाजी सावंत यांनी श्री. उद्धव ठाकरे यांच्यासमोर सर्व करमाळकरांना शब्द दिला खरा पण स्वतः तानाजी सावंत यांनाच पक्षातून बाजूला व्हावे लागले होते. त्यांचे मंत्रिपद तर गेलेच होते शिवाय उपनेते पद ही काढून घेतले. त्यामुळे ते बराच काळ आदिनाथच काय तर करमाळा तालुक्याच्या राजकारणातून थोडेसे अलिप्त झाल्याचे दिसून आले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी परांडा येथे विधानसभा निवडणूक विजयी होत स्वतःची ताकद दाखवून दिली होती. तरी देखील ते करमाळ्याच्या राजकारणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत होते. पण त्यासाठी त्यांची ताकदच पक्षाने काढून घेतल्यामुळे ते त्यांचाही नाईलाज झाला होता.

अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात पुन्हा एकदा सावंत यांना मोठी जबाबदारी मिळाल्याने तानाजी सावंत पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्यांनी सक्रिय होताच पहिल्याच महिन्यात आदिनाथ साठी आपला शब्द दिलेला पूर्ण करत जयवंत शुगरच्या माध्यमातून ओटीएस प्रमाणे तीन कोटी चार लाख रक्कम तर बँकेत भरलीच होती शिवाय काही दिवसांपूर्वी पाच कोटी ७१ लाख असे एकूण आठ कोटी ७५ लाख १७ हजार रुपये तानाजी सावंत यांनी बँकेत भरल्याने आता आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्त्वावर सुरू करण्यास अडचणी दूर झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...