आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील ११ पैकी सहा आमदार पक्षाचे निवडून येत हाेते. महापालिकेत सत्तेत वाटा हाेता, पण २०१४ नंतर हे चित्र पूर्ण पालटले आणि केवळ दाेन आमदारापुरता हा पक्ष सीमित झाला. आता पुन्हा हे वर्चस्व निर्माण करण्याच्या उद्देशानेच राष्ट्रवादीने काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना जवळ केले आहे. त्या दृष्टीने डावपेच आखायला पवारांनी सुरुवात केली हे नक्की. पण हे नेते म्हणजे महाविकास आघाडीतील असल्याने भाकरी तीच फक्त तवा बदलला, अशी स्थिती आहे.
पवार नुकतेच सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले. जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग असला तरी तो आधी काँग्रेस आणि आता भाजपकडे झुकला आहे. साेलापूर, अक्कलकाेट, दक्षिण साेलापूर व शहर मध्यमध्ये राष्ट्रवादी नाही.
येणाऱ्या काळात सोलापूर लोकसभेवर हक्क सांगणे आणि काँग्रेसचेच स्थानिक नेते घेऊन आपले वर्चस्व पुन्हा निर्माण करणे हे पवारांचे डावपेच स्पष्ट दिसताहेत, पण मविआ म्हणून जर लढायचे असेल तर राष्ट्रवादीत काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांना घेतल्याने काँग्रेस कमकुवत होईल. भाजपला टक्कर देण्यासाठी ही ताकद पुरेशी आहे का? हा प्रश्न आहेच. फक्त भाकरी या तव्यावरून त्या तव्यावर एवढेच, अशी स्थिती आहे. कारण काँग्रेसमधील महेश कोठे, माजी महापौर यु. एन. बेरिया, सुधीर खरटलम तर एमआयएमचे तौफिक शेख ही मंडळी राष्ट्रवादीसाठी काम करणार आहेत. त्यामुळे स्वबळावर लढले तर काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीचे पारडे निश्चितच जड आहे, जर मविआ एकत्र लढली तर या मंडळींना शिवसेना, काँग्रेससाठीही काम करावेच लागेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.