आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलगुरू डॉ. फडणवीसांनी उचलले पाऊल:परीक्षेच्या कामकाजात चुका करणाऱ्या प्राध्यापकांना दंड, परीक्षा बंदीची कारवाई

सोलापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातत्याने घडणाऱ्या चुकांच्या मालिकेकडे दुर्लक्ष करून ऑल इज वेल म्हणणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला अखेर काही प्रमाणात जाग आली असून चुका करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी विद्यापीठाने दर्शवली आहे. शुक्रवारी परीक्षा विभाग संचालक, अधिकारी यांच्यासमवेत आढावा घेत परीक्षेच्या कामकाजात हलगर्जीपणा तसेच चुका करणाऱ्या पेपरसेटर प्राध्यापकांवर कडक कारवाई करण्यात आली. याबाबतची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

गेल्या १४ जुलैपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन बहुपर्यायी प्रश्नांद्वारे चालू आहेत. या परीक्षेचा आढावा कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी शुक्रवारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर तसेच अधिकाऱ्यांकडून जाणून घेतला. चुकीचे पेपर सेट करणाऱ्या प्राध्यापकांच्या हलगर्जीपणामुळे विद्यापीठास नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याची गंभीर दखल विद्यापीठ प्रशासन घेतली असून परीक्षेच्या कामकाजात म्हणजेच प्रश्नपत्रिकेत व इतर बाबींमध्ये चुका करणारे पेपरसेटर प्राध्यापक असोत अथवा अधिकारी-कर्मचारी असोत, त्यांची गय केली जाणार नाही.

चुकांचा विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ देणार नाही परीक्षेतील चुकांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणावर होणार नाही. यातून मार्ग काढून विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही, याची खबरदारी घेत आहोत. विद्यार्थ्यांना जितके काही चांगले देता येईल, ते देण्याचा प्रयत्न आहे. - डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू

बातम्या आणखी आहेत...