आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवीची विशेष पूजा:पाेशम्मादेवी उत्सवाची मिरवणुकीने सांगता

सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्वभागातील पाेशम्मादेवी उत्सवाची मिरवणुकीने सांगता झाली. शनिवार पेठेतील मरगमपट्टी पाेशम्मा, जुना आणि नवीन विडी घरकुल येथील मंदिरातूनही या मिरवणुका निघाल्या. डाेक्यावर जलकुंभ घेऊन महिलाही त्यात सहभागी झाल्या हाेत्या.

यंदा निर्बंध हटवल्याने या उत्सवाला उधाण आले हाेते. पाेशम्मादेवी मंदिरांसमाेर नैवेद्य देण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागलेल्या हाेत्या. पाेशम्मादेवीसह यल्लम्मादेवी, महालक्ष्मी, म्हसाेबा या लाेकदेवतांनाही नैवेद्यासह नारळ वाढवला जाताे. आषाढ महिन्यातील पाैर्णिमेपासून अमावास्येपर्यंत हा उत्सव हाेताे. अमावास्येदिवशी मिरवणूक काढून त्याची सांगता हाेते.शनिवार पेठेतील पाेशम्मादेवी मंदिरात अमावास्येदिवशी देवीची विशेष पूजा असते. हिरव्या रंगाची खणसाडी नेसवण्यात येते. फुलांची सजावट करून घाेंगडी अर्पण करण्यात येते. पंधरा दिवस भक्तांच्या भेटीने देवीचा क्षीण घालवण्यासाठी ही विशेष पूजा असते. शनिवार पेठ मंदिरातील पुजारी गाेपाळ चन्ना यांनी ही पूजा केली हाेती.

बातम्या आणखी आहेत...