आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राणघातक हल्ला:राऊतसह तीन जणांची उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनप्रकरणी याचिका माघार

बार्शी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे तत्कालीन गटनेते नागेश अक्कलकोटे प्राणघातक हल्ला प्रकरणात माजी नगरसेवक विजय राऊतसह तीन जणांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेला अटकपूर्व जामीनप्रकरणी याचिका माघार घेण्यात आली. नंतर उच्च न्यायलयाने याचिका डिसमिस केली. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्यासमोर अंतिम सुनावणी झाली. अक्कलकोटे यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. आरोपींना जामीन अर्जावर तपशीलवार आदेश हवा आहे की अटकपूर्व जामीन अर्ज मागे घ्यायचा आहे का, असे कार्टाने विचारले. अॅड. ए.पी.मुंदर्गी यांनी आरोपींकडून माहिती घेण्यासाठी थोडा वेळ मागितला. वकील मुंदर्गी यांनी जामीनप्रकरणी अर्ज माघारी घेत असल्याचे सांग्ितले. तेव्हा उच्च न्यायालयाने अर्ज डिसमिस केला. १ ऑगस्ट २०१४ रोजी अक्कलकोटे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात विजय राऊत, दीपक राऊत, सोन्या हाजगुडे, मुन्ना बोते, डंग्या यादव, दीपक धावारे, रणजित चांदणे, प्रकाश राऊत, विशाल चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

तत्कालीन पोनि सालार चाऊस यांनी विजय राऊत, दीपक धावारे, रणजित चांदणे यांचे नाव वगळून इतर आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. यास अक्कलकोटे यांनी न्यायालयात आव्हान दिले. तत्कालीन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी जे. आर. राऊत यांनी सीआरपीसी १६९ प्रमाणे तीन आरोपी वगळण्याचा अहवाल फेटाळून लावत प्रोसेस इश्यूचे आदेश दिले होते. त्यावर राऊत व इतरांनी सत्र न्यायालयात रिव्हिजन अपिल केले होते. ते फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे सुनावणी झाली. न्यायालयाने निर्णयाची इच्छा आहे की, अपील मागे घेताय अशी विचारणा केल्यानंतर ते अपील मागे घेतले होते.

बातम्या आणखी आहेत...