आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक चित्र व पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन:चित्र, पोस्टर्स स्पर्धेतून जागर स्वातंत्र्य संग्रामाचा

साेलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर शहर काँग्रेस इंटक विभाग आणि धर्मा भोसले सोशल फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य संग्राम चळवळीवर आधारित राज्यस्तरीय खुल्या गटात प्रासंगिक चित्र व पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शहर काँग्रेस इंटक विभागाचे अध्यक्ष व प्रदेश युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस विनोद भोसले यांनी दिली.

स्पर्धेसाठी स्वातंत्र्यसंग्राम चळवळीचा इतिहास दर्शविणारे प्रासंगिक चित्र किंवा पोस्टर , “शोध भारताचा “ ( पंडित जवाहरलाल नेहरू यांचे प्रसिद्ध पुस्तक ), “राष्ट्रीय एकात्मता हेच भारताचे बलस्थान’ आणि “ स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षातील भारताच्या आर्थिक सामाजिक व वैचारिक प्रगतीमध्ये काँग्रेसचे योगदान’ हे विषय देण्यात आले आहेत. पोस्टर स्पर्धेसाठी घोषवाक्य आवश्यक आहे. दोन्ही चित्र प्रकारातील आकाराची मर्यादा हाफ किंवा फुल इम्पेरियल माउंट बोर्ड अशी राहील. ही स्पर्धा निशुल्क आहे. ५ सप्टेंबर २०२२ पर्यंत नरसिंग गिरजी मिल चाळ मुरारजी पेठ येथील धर्मा भोसले सोशल फाउंडेशनकडे चित्रे पाठवावी. अधिक माहितीसाठी सौरभ साळुंखे ९०११९४९१७२ यांच्याशी संपर्क साधावा.

५८ हजारांची बक्षिसे
प्रसंग चित्र पेंटिंगसाठी प्रथम १५ हजार , द्वितीय १० हजार ,तृतीय ५ हजार आणि उत्तेजनार्थ ३ हजार रुपयांचे पारितोषिक तसेच पोस्टर पेंटिंगसाठी प्रथम १० हजार ,द्वितीय ७ हजार , तृतीय ५ हजार आणि उत्तेजनार्थ ३ हजाराचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...