आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंढरपुरात आषाढी यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी व भाविक येत असतात. पालखी सोहळ्यासह सोबत येणाऱ्या वारकरी, भाविकांना पालखी मार्गावर व पालखी तळावर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून योग्य नियोजन करावे, अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.
आषाढी यात्रा पूर्व तयारीबाबत शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठकीचे आयोन करण्यात आले होते. या बैठकीला तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, पोलिस निरीक्षक अरुण पवार, धनंजय जाधव, मिलिंद पाटील, उपकार्यकारी अभियंता डी. व्ही. मुखडे, भीमा कालवा मंडळाचे उपविभागीय अधिकारी सुनील चौगुले, आगार व्यवस्थापक सुधीर सुतार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. गुरव म्हणाले, यंदाची आषाढी वारी यात्रा १० जुलै रोजी असून, या आषाढी यात्रेसाठी मानाच्या पालख्यांसह इतर संस्थानच्या पालख्या पंढरपुरात येतात. येणाऱ्या पालखी सोहळ्यांना पालखी मार्गाबरोबरच पालखी तळावर कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी पालखी मार्ग व पालखी तळावरील काटेरी झुडपे काढावीत, ज्या ठिकाणी अतिक्रमणे असतील ती तत्काळ काढावीत. पालखी रथाच्या उंचीच्या प्रमाणात इलेक्ट्रिक तारा व इतर अडथळे येणार नाहीत. यासाठी पाहणी करून तत्काळ कार्यवाही करावी. पालखी मार्गावर व पालखी तळांवर पाण्याचे स्रोत निश्चित करावेत. पाण्याचे नमुने तपासणी करुन पाणी पिण्यास योग्य-अयोग्य याबाबतचे माहिती फलक लावावेत. पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था याबाबत नियोजन करावे. त्याचबरोबर स्वच्छता, आरोग्य सुविधा, सुरक्षा, अखंडीत वीजपुरवठा याबाबत दक्षता घ्यावी, असेही श्री. गुरव यांनी सांगितले.
भाविकांच्या सुरक्षेची काळजी घ्या
नगरपालिका, भीमा कालवा मंडळ, पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे चंद्रभागा नदीवरील घाटांची सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करुन जाण्याचे व येणाचे मार्ग निश्चित करावेत, अशा सूचनाही प्रांताधिकारी गुरव यांनी या वेळी दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.