आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:आषाढी वारीसाठी चार हजार एसटी सोडण्याचे नियोजन ; यंदा चांगली तयारी करण्यात आली आहे

सोलापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या आषाढी वारीसाठी एसटी महामंडळातर्फे नियोजन सुरू आहे. राज्यभरातून चार हजार गाड्या सोडण्याची तयारी आहे. याबाबत १४ जून रोजी होणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या बैठकीनंतर निर्णय होणार असल्याचे विभागीय अधिकारी सुरेश लोणकर यांनी सांगितले. कोरोना आणि कर्मचारी संपामुळे गेल्या दोन वर्षात एसटीचे योग्य नियोजन झाले नव्हते. यंदा चांगली तयारी करण्यात आली आहे. यंदा किमान चार हजार गाड्या संपूर्ण राज्यात सोडण्यात येणार आहेत. शिवाय, जिल्हा प्रशासनाकडून काय प्रस्ताव असणार आहे, यावर चर्चा झाल्यानंतर आकडेवारी जाहीर होईल. १४ जूनला एसटी महामंडळ आणि जिल्हा प्रशासन मिळून या सर्व गोष्टी ठरवतील. गेल्या अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ वर्षाकाठी पंढरपूर येथे होणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणीच्या आषाढी वारीकरिता राज्यातील इतर विभागाच्या दीड ते दोन हजार गाड्या मागवतात. यंदा याचे प्रमाण अधिक असणार आहे. येणारी आषाढी वारी एसटी महामंडळाच्या दृष्टिकोनातून सेवा देण्यासाठी सर्वात मोठी असावी, असा प्रयत्न केला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...