आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटाटा यांनी बांधलेल्या धरणांभोवती लावण्यात आलेल्या झाडांमुळे गाळ जमा होत नाही. त्याचप्रमाणे उजनीच्या धरणाभोवती वृक्षारोपण का केले जात नाही? असा सवाल अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांनी केला आहे. ते मध्य रेल्वे, सोलापूर मंडळ यांच्याकडून स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी केंद्रीय विद्यालय सोलापूर या ठिकाणी तसेच स्मृती उद्यानासमोर असलेल्या रेल वन विहारात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मारुती चितमपल्लींनी टाटांच्या 6 धरणांबद्दल मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, त्याठिकाणी केलेल्या वृक्षारोपणामुळे टाटांच्या धरणामध्ये गाळ साचलेला नाही. तर त्या तुलनेने आपल्या उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ झालेला आहे. त्यामुळे इथे या गोष्टीचा विचार व्हायला हवा. शिवाय सोलापूर मध्ये सरकारी व खाजगी नर्सरी मोठ्या प्रमाणावर व्हायला हव्या. असेही ते म्हणाले.
"मुझे ना काटो" वृक्ष गीत
यावेळी केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी "मुझे ना काटो" हे वृक्ष गीत सादर केले. याप्रसंगी मारुती चितमपल्ली यांनी उपक्रमाचे कौतुक केले. वड, पिंपळ, कडूनिंब, चिंच, बहावा, करंज, अर्जुन इत्यादी प्रकारच्या 325 रोपांचे वृक्षारोपण रेल वन विहार येथे करण्यात आले आहे. केंद्रिय विद्यालय येथे 25 रोपे लावण्यात आली. यासाठी भारत कन्स्ट्रक्शन, जैन मंदिर कोंडी, माऊली लॅन्डमार्क, पु.ना. गाडगीळ यांनी रोपे देऊन सहकार्य केले. यावेळी शिवानंद हिरेमठ यांनी वन्यजीवांची माहिती दिली.
कंपोस्ट खतनिर्मितीची माहिती
पर्यावरण संरक्षण गतीविधीचे प्रविण तळे यांनी इको-ब्रिक्स कशा तयार करता येतात आणि छतावरील पाणी साठविण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. मनमोहन बरेंकल यांनी कंपोस्ट खतनिर्मिती आणि कचरा व्यवस्थापनाची प्रात्यक्षिक माहिती दिली. शिवाजी कदम यांनी वृक्षारोपण उपक्रमाचा उद्देश सांगितला. यावेळीं मुग्धा दाते, अश्विनी वाघमोडे-मोरे, संगीता उस्तुर्गे, अनिल जोशी विजय जाधव, मदन पोळके, संतोष धाकपाडे, शैलेश स्वामी यांच्यासह स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.