आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसुंधरेच्या जतनासाठी:वनशहीद दिनानिमित्त वृक्षदिंडी, पर्यावरण स्वच्छता अभियान; सिद्धेश्वर वनविहारात 5000 झाडांचे वृक्षारोपण

सोलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वनविभाग, सोलापूर महानगरपालिका माझी वसुंधरा अभियान संत निरंकारी मंडळ, जाणीव फाऊंडेशन, माऊली लँडमार्क, सोलापूर, पर्यावरण संरक्षण गतिविधी, श्री श्याम बाबा मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट व सोलापूर शहरातील सर्व एन.जी.ओ. तसेच सोलापूर शहरासोबतच बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, मोहोळमधील विविध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 5000 बांबू या वृक्ष रोपाचे वृक्षारोपण उपक्रमाचा शुभारंभ सिद्धेश्वर वनविहारमध्ये घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस वन शहीद दिनानिमित्त वृक्षदिंडी तसेच पर्यावरण स्वच्छता अभियान रॅलीचे वनभवन ते सिद्धेश्वर वनविहरपर्यंत आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत सोलापुरातील प्रशाला, विद्यालये व अनेक शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.वन संरक्षणासाठी शहीद झालेल्या वन शहीदास आदरांजली वाहिली. आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर कार्यक्रमच्या अध्यक्षपदी होती.

आदींची उपस्थिती

यावेळी उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, माजी आमदार नरसिंग मेंगजी, सहा. उपवनसंरक्षक लक्ष्मण आवारे, सहा. उपवनसंरक्षक बाबा हाके, वनक्षेत्रपाल दिपक खलाणे, केंद्रीय माहिती विभागाचे अंकुश चव्हाण, रेल्वे जनसंपर्क अधिकारी शिवाजी कदम, माऊली झांबरे, स्काऊट गाईडचे संचालक मोरे, संत निरकरी मंडळचे इंद्रपाल महाराज, वनपाल शंकर कुताटे आदी उपस्थित होते. संत निरंकार मंडळ व ब्राह्मण समाज सेवा या अशासकीय संस्था यांनी कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या शाळा व विध्यार्थी, व लोकांसाठी पोषक अल्पोआहाराची सोय केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनरक्षक सौ. यशोदा आदलिंगे, आश्विनी वाघमोडे यांनी केले. या कार्यक्रमाचे समन्वय, नियोजन पर्यावरण, वन्यजीव स्नेही संस्थानी केले.

5 हजार रोपं लावली

वनविहारमध्ये विद्यार्थी, पर्यावरण स्नेही संस्थांच्या मदतीने एकाच दिवशी 5 हजार बांबूची रोप लावण्यात आली. शहरातील 4 शाळांमधील 350 पेक्षा अधिक विद्यार्थी, 100 पर्यावरण प्रेमी संस्थांनी वृक्षारोपणसाठी विशेष पुढाकार घेतला. विविध संस्था, संघटनेच्या पुढाकाराने शहरात पर्यावरण जागृतीबाबत मोठा उपक्रम शहरात झाला.

बातम्या आणखी आहेत...