आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसाचा मृत्यू:मंगळवेढ्यात वाळू उपसा करणाऱ्या पिक-अप ट्रकने पोलिस काँस्टेबलला उडवले, जागीच मृत्यू; खूनाचा गुन्हा दाखल, तीन जण ताब्यात

मंगळवेढा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथे बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या माफियांनी कारवाईसाठी आलेल्या पोलिस कर्मचारी गणेश सोनलकर यांना उडवले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

लोक अदालतच्या समन्स बजावणीच्या कामाकरिता गेलेल्या रस्त्यावर उभा असलेल्या मोटारसायकलवर बसलेल्या पोलिस काँस्टेबल गणेश प्रभू सोलनकर वय 32 यांना अवैद्य वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या भरधाव पिकपने जाणीवपूर्वक धडक देऊन जीवे ठार मारल्याची तक्रार गोणेवाडीचे पोलिस पाटील संजय मेटकरी यांनी दिली. ही घटना आज सकाळी पावणे दहा वाजेच्या दरम्यान गोणेवाडी ते शिरसी रोडवर, शिरसी गावालगत हॅटसन डेअरीजवळील वेताळ मंदीरासमोर घडली आहे.

जाणीवपूर्वक खून केल्याची तक्रार

याबाबत सविस्तर माहिती अशी, पोकॉ गणेश प्रभु सोलनकर हे लक्ष्मी दहिवडी बिटला नेमणुकीस असून त्या बीटमधली लोक अदालतच्या समन्स बजावणीच्या पोहोच आणण्याकरिता गेले होते. सकाळी साडेनऊ वाजता फोन करून गावकामगार पोलिस पाटील संजय मेटकरी यांना मोबाईल द्वारे मोबाईलवर फोन करून नोटीस घेऊन गावात या असे सांगितले होते, फिर्यादी गोणेवाडी स्टँडवर आल्यानंतर पो. कॉ सोलनकर यांनी हॉटसन डेअरीजवळ येण्यास सांगितले, फिर्यादी हे गावातील नवनाथ मासाळ यांना मोटारसायकलवर घेऊन हॅटसनजवळ आले असताना सोलनकर हे रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून गाडीवर बसलेले दिसले, त्याचवेळी फिर्यादीच्या पाठीमागून आलेल्या वाळूने भरलेला पांढऱ्या रंगाच्या बिगर नंबरच्या इंट्रा.व्ही या पिकअप अतिशय वेगाने शिरसीच्या दिशेने पुढे जात असताना, सोलनकर यांनी उजव्या हाताने थांबण्याचा इशारा केलेला असता जोराची धडक दिली, पो कॉ सोलनकर यांचा जाणीवपूर्वक खून केला अशी फिर्याद दिल्यानंतर विनापरवाना वाळू वाहतूक करणारा त्याचा चालक व त्याचा साथीदार व त्या गाडीचा मालक या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते ,अप्पर पोलीस अधीक्षक हेमंत जाधव पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे ,सांगोल्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.बी.पिंगळे यांनी भेट दिली आहे.

नातेवाईकांकडून तीव्र संता व्यक्त
जखमी पोलिसा कॉन्टेबल सोलनकर यांना १०८ रुग्णवाहिकेतून मंगळवेढा येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारापूर्वी त्यास मृत घोषित करण्यात आले. परंतु शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टरांनी कित्येक तास ताटकळत ठेवल्याने मृत सोलनकर यांच्या नातेवाईकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

वाळू उपसा व चोरी रोखण्यासाठी पोलिस दलाने प्रयत्न केले आहेत, तरीदेखील काही ठिकाणी वाळू चोरी सुरुच आहे, नागरिकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून यासाठी प्रयत्न करावा. या घटनेनंतर तीन आरोपी ताब्यात घेतले आहे, त्यापैकी एक अल्पवयीन आहे. घडलेली घटना अतिशय दुःखद असून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

पोलीस शिपाई सोनवलकर यास अखेरचा निरोप
पोलीस शिपाई सोनवलकर यास अखेरचा निरोप
बातम्या आणखी आहेत...