आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:निवृत्तीनंतरही पेन्शन सुरू न झाल्याने पोलिसांची आत्महत्या

सोलापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कारागृह पोलिस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. कल्याण दगडू गवसाने (वय ५३, रा. माशाळवस्ती प्रेमप्रतीक अपार्टमेंट, विजापूर रोड) असे त्यांचे नाव आहे. पाच महिन्यांपूर्वी त्यांनी आजारपणामुळे स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. आजार आणि निवृत्तिवेतन सुरू न झाल्याने ते वैफल्यग्रस्त होते. त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांना लावला आहे.

गवसाने यांनी गुरुवारी रात्री सात रात्री सातच्या सुमाराला घरी गळफास घेतला. उपचाराला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलिस चौकीत आहे. कल्याण गवसाने यांनी सोलापूर, उस्मानाबादेतही काम केले आहे. ते नाशिक येथे सवेत होते. त्यावेळी त्यांना पदोन्नती देण्यात आली. पण आजारपणामुळे त्यांनी ती नाकारली. त्यांचे निवृत्तीवेतन, ग्रॅज्युटी व अन्य सुविधा नाशिक कारागृह प्रशासनाकडून अजून मिळालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी हा प्रकार केल्याचा आरोप त्यांचा मुलगा धनंजय गवसाने यांनी पत्रकारांशी बोलताना केला.नाशिक येथील कारागृह प्रशासन वेळेत काम करण्यासाठी टाळाटाळ केली. पैशाची मागणी केल्याचाही आरोप धनंजय यांनी केला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...