आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्दैवी मृत्यू:निरोप समारंभ उरकुन घराकडे जाणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू,शोकाकुल वातावरणात पार्थिवावर अंत्यसंस्कार

माढा4 महिन्यांपूर्वीलेखक: संदीप शिंदे
  • कॉपी लिंक

पोलिस ठाण्यातला निरोप समारंभ उरकून घराकडे जात असताना पोलिस कर्मचाऱ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुखद घटना रविवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास घटना घडली. महेश भारत आधटराव (मुळ रा.दारफळ(सिना)ता.माढा) असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. घरापासून ५ किमी दूर असताना महेश यांचा अपघात झाला. बीड आणि सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने महेश यांना दारफळ गावात सलामी देत शोकाकुल वातावरणात महेश याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश यांची नुकतीच बीड येऊन जिल्ह्यातील गेवराईमध्ये प्रशासकीय बदली करण्यात आली होती. महेश यांचा पत्रकारांनी व पोलिस कर्मचाऱ्यांच्या समक्ष नेकनूरमध्ये शनिवारी रात्री पोलिस ठाण्यात निरोप समारंभ पार पडला. त्यानंतर घराकडे मारुती स्विफ्ट कार (एम.एच.२३ एस.एस.६००४)ने जाताना कारचा ताबा सुटला आणि कार डिव्हाईडरवर आदळून नदीत कोसळली. बीड गेवराई मार्गावरील खजाना विहिरीच्या परिसरात हा अपघात घडला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महेश यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. निरोप समारंभात पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यासह पत्रकार बांधवांबद्दल महेश यांनी कृतज्ञता व्यक्त करीत निरोप दिला. पोलिस आणी पत्रकारांना महेश याचा तो निरोप अखेरचा ठरेल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते.

महेश याच्या पश्चात आई,वडील,पत्नी,दोन मुले,भाऊ,भावजय असा परिवार आहे. २००६ साली पोलिस दलात कार्यरत झालेल्या महेश यांनी १५ वर्षांत उल्लेखनीय कार्य केले. कोरोना लाॅकडाऊन काळात कर्तव्यावर असताना लिंबा गणेशा गावात वादळी वाऱ्यामुळे उडालेले वृध्द दांपत्याचे घर स्वत;ह च्या खर्चातून पूर्ववत करुन खाकीतून माणुसकी दाखवली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser