आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास:पोलिस हवालदाराच्या पत्नीचे‎ पाच तोळ्यांचे दागिने चोरीला‎

सोलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्याकडे जाताना गाणगापूर- भिवंडी‎ एसटी बसमध्ये महिलेच्या पर्समधील‎ पाच तोळ्यांचे दागिने चोराने पळवले‎ आहेत. जबीन मकसूद तांबोळी (रा.‎ शिवती, ता. औसा, लातूर, सध्या‎ कोंढवा, पुणे) यांनी सोमवारी फौजदार‎ चावडी पोलिसात फिर्याद दिली.‎ जबीन तांबोळी यांचे पती पुणे शहर‎ पोलिस दलात हवालदार म्हणून काम‎ करतात. त्यांच्या मूळ गावी म्हणजे‎ औसा येथे रविवारी आले होते. दुपारी‎ चारच्या सुमाराला पुण्याला‎ जाण्यासाठी सोलापूरच्या एसटी‎ स्थानकावर आल्यानंतर गाणगापूर‎ -भिवंडी बसमध्ये जाताना त्यांच्या‎ पर्समधील दागिने काढून घेण्यात आले.‎ गंठण, नेकलेस, कानातील फुले,‎ सोन्याचे लॉकेट, मिनी गंठण असे‎ एकूण पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने‎ चोरीला गेल्याची तक्रार देण्यात आली‎ आहे. एकूण १ लाख ४४ हजार रुपये‎ किमतीचे दागिने आहेत.

बसमध्ये‎ बसल्यानंतर पर्समध्ये दागिने नव्हते.‎ काही काळ बस स्थानकावरील पोलिस‎ मदत केंद्रासमोर थांबली होती त्या‎ दरम्यान ही चोरी झाली आहे की‎ बसमध्ये जाताना दागिने काढून घेण्यात‎ आले आहेत, याचा तपास सुरू आहे.‎ तीनच दिवसांपूर्वी सांगोला‎ तालुक्यातील एका वैद्यकीय शिक्षण‎ घेणाऱ्या तरुणाच्या खिशातील‎ आयफोन आणि एका व्यक्तीच्या‎ खिशातील फोन असे दोन मोबाइल‎ फोन चोरीला गेले होते.‎

बातम्या आणखी आहेत...