आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑपरेशन परिवर्तन:सोलापूरमध्ये ग्रामीण पोलिसांचे 18 जून रोजी हस्तकला प्रदर्शन; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

सोलापूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण पोलिस दलातर्फे ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने सोलापूरमध्ये 18 जून रोजी हस्तकला वस्तू प्रदर्शनाचा शुभारंभ ग्रामीण पोलिस मुख्यालय मैदानावर दुपारी तीन वाजता होणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया उपस्थित राहणार आहेत.

कंपनीच्या माध्यमातून काम

मुळेगाव तांडयासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या तांडयावरती हातभट्टी दारू गाळण्यात येत होते. यावर पोलिसांनी बंदी आणून त्यातील अनेक व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तसेच महिलांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने शिलाई मशीनचे प्रशिक्षण देऊन त्यांना कपडे ( शटॅ ) तयार करण्यासाठी कंपनीच्या माध्यमातून काम देण्यात आले आहे. याशिवाय बंजारा समाजातील हस्तकलाही शिकविण्यात आले आहे. या सर्व वस्तूंना बाजारपेठ मिळावा त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठेत मागणी यावी, यासाठी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्पादन वस्तूंचे प्रदर्शन व विक्री उपक्रम ठेवण्यात आला आहे.

उद्देश काय आहे

१) हातभट्टी दारूचे उत्पादन व विक्रीचे समूळ उच्चाटन करणे.

२) बंजारा समाजाला रोजगार उपलब्ध करून देणे.

३) बंजारा समाजाच्या कशिदकरी कलाकृतीचे जतन व्हावे.

४) या कलाकृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत हस्तांतरित व्हावा.

बातम्या आणखी आहेत...