आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानऊ जणांवर गुन्हा दाखल
विजापूर नाका पोलिस हद्दीतील तीन ठिकाणी छापा टाकण्यात आला. यात कल्याण मटका जुगार खेळताना, तसेच आकड्यावर पैज लावताना आढळल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल झाला आहे.
विजापूर रोड सैफूल येथे कारवाई झाली. यात प्रशांत सिद्धाराम हरवत (वय ३८,रा. सुंदरम नगर) व राहुल मोटे (रा. सोलापूर) या दोघांवर गुन्हा दाखल झाला. यात तीनशे रुपये रोख रक्कम व जुगार साहित्य आढळले. डी. मार्टजवळील पाण्याच्या टाकीजवळ कारवाई झाली. यात प्रकाश श्रीमंतराव पाटील, अप्पू चौघुले, प्रसाद लांेढे, निखील भोसले (सर्व रा.सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या कारवाईत दोन हजार ८० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
अमृत नगर येथे कारवाई झाली. यात मल्लिनाथ वीरभद्रप्पा चोळ्ळे, संदीप जयप्रताप सुरतगावकर, सागर कदम यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या कारवाईत ३ हजार ५४० रुपये रोख रक्कम आढळली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.