आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावेळापूर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणारे मळोली ता. माळशिरस हे संवेदनशील गाव आहे. गावातील दारूबंदीसाठीचे प्रयत्न सतत चालू आहेत. त्या अनुषंगाने गावातील भामाबाई गणू जाधव यांनी मी दारू विक्री करणार नाही, परंतु मला खाण्यासाठी काही तरी द्या. मला मदत करा, अशी आर्त हाक दिली.
त्याला साद देताना वेळापूर पोलिस ठाण्याचे मळोली येथील बीट अंमलदार पोलिस हवलदार उमाजी चव्हाण यांनी स्वखर्चाने २५ किलो गहू, ५ किलो तांदूळ गोडेतेल अशा जीवनावश्यक वस्तूंची मदत घरी सुपूर्द केली.‘दारू विक्रीच्या अवैध व्यवसायापासून परावृत्त होण्यासाठी भविष्यात केव्हाही फोन करा, आम्ही मदत करण्यास तयार सदैव आहोत.’असा उमाजी चव्हाण यांनी भामाबाई जाधव यांना आश्वासित केले. यापुढे अवैध दारू विक्री करू नका, असे सांगितले. यामुळे पोलिसाकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदललेला आहे.
पोलिसांचे होत आहे कौतुक
पोलिसांची सामाजिक बांधिलकी जपत केलेली अनोखी मदतीची परिसरात एकच चर्चा होत आहे. मळोली गावातील दारू बंदीसाठी वाद-विवाद तंटे गावपातळीवर सोडवण्यासाठी प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी कार्यतत्पर असणाऱ्या मळोली गावचे बीट अंमलदार पोलिस हवलदार उमाजी चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.