आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य पोलिस भरती मार्फत विविध जिल्ह्याच्या ठिकाणी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातही भरती साठी तारीख जाहीर केली आहे. बुधवार, दि . ९ पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल. त्यामध्ये खुल्या वर्गासाठी ७७,ओबीसी ५०,तर एसटी ४९ जागा,एससीसाठी २७ दिलेल्या आहेत. भरती निघाल्यामुळे भरती पूर्व तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये आनंदी वातावरण आहे. सोलापूर शहर, ग्रामीण व राज्य राखीव पोलिस बल गट क्र १० या दलात पोलिसांची जवळपास २५८ पदे भरण्यात येतील.
यात चालक व शिपाई पदांचा समावेश आहे. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात अर्ज करू शकतात. पोलिसभरती मधील पोलिस शिपाई व पोलिस चालक पदासाठी प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे.
त्याची तारीख लवकरच जाहीर होईल. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळवणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १.१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणाची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे.
लेखी परीक्षेत ४० टक्के पेक्षा कमी गुण मिळणारे उमेदवार अपात्र समजण्यात येणार आहेत. कागदपत्रे पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवड सूचीमध्ये समावेश केला जाईल. निवड सूचीतील उमेदवारांची निवड तात्पुरती असेल. शारीरिक चाचणी व लेखी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतर गृहविभागाच्यावतीने अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगितले आहे.
आरक्षणानुसार अशा असतील तिन्ही विभागातील जागा
ग्रामीण-अनु.जाती-०, अ.ज.-२९, विजा अ-०, भज ब-१, भज क-०, भज ड- १, विमाप्र-१, इमाव- ६,ई डब्ल्यू एस ५, खुला ११ सोलापूर शहर- अनु.जाती-२२, अ.ज.-१२, विजा अ-५, भज ब-४, भज क-६, भज ड-३, विमाप्र- ३,इमाव-३३, ई डब्ल्यू एस १७, खुला ७७ राज्य राखीव पोलिस दल -अनु.जाती-५, अ.ज.-८, विजा अ-३, भज ब-१, भज क-२, भज ड-१, विमाप्र- २,इमाव-११, ई डब्ल्यू एस ०, खुल्ला ० इमाव- ५०, ईडब्ल्यूएस २२, खुला ७७ खुला वर्ग ७७, ओबीसी ५०, एसटी ४९, एससीसाठी २७ जागा सोलापूर शहर चालक ७३ ,पोलिस शिपाई ९८, सोलापूर ग्रामीण चालक २८, पोलिस शिपाई २६, राज्य राखीव पोलिस बल ३३ पदे आहेत. पोलिस शिपाई, चालक पोलिस व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १० च्या कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या रिक्त जागेसंदर्भातील सविस्तर माहिती , अटी , नियम व अन्य माहितीसाठी policerecruitment202 2.mahait.org या संकेतस्थळाला भेट द्यावी व अर्ज सादर करण्याबाबतची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
खुला वर्ग ७७, ओबीसी ५०, एसटी ४९, एससीसाठी २७ जागा
सोलापूर शहर चालक ७३ ,पोलिस शिपाई ९८, सोलापूर ग्रामीण चालक २८, पोलिस शिपाई २६, राज्य राखीव पोलिस बल ३३ पदे आहेत. पोलिस शिपाई, चालक पोलिस व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १० च्या कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या रिक्त जागेसंदर्भातील सविस्तर माहिती , अटी , नियम व अन्य माहितीसाठी policerecruitment202 2.mahait.org या संकेतस्थळाला भेट द्यावी व अर्ज सादर करण्याबाबतची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.