आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर पोलिस दलाच्या भरतीसाठी सोमवारपासून मैदानी चाचणी प्रक्रिया सुरू झाली. एकूण सहाशे उमेदवारांना बोलवण्यात आले होते. त्यापैकी ३२७ उमेदवारांची मैदानी चाचणी झाली. पहाटे पाचपासूनच उमेदवारांना मैदानात घेण्यात आले. सुरुवातीला कागदपत्रांची पडताळणी झाली. त्यांना चेस्ट क्रमांक देण्यात आले. त्यानंतर शंभर मीटर व सोळाशे मीटर धावणे, गोळा फेक आणि डीप्स चाचणी घेण्यात आली.
पोलिस आयुक्त राजेंद्र माने, उपायुक्त अजित बोराडे, विजय कबाडे, दीपाली काळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त, पोलिस निरीक्षक, फौजदार आणि दोनशेहून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी नियोजनासाठी नेमले आहेत. शहर पोलिस मुख्यालय मैदानावर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सूचना देण्यासाठी लाऊड स्पीकरची सोय आहे.उमेदवारांची मैदानी चाचणी नोंदणी घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मशीन, सीसीटीव्ही कॅमेरे आणि व्हिडिओ शूटिंग करण्यात आले होते. मंगळवारी ९०० उमेदवारांना बोलावले आहे.
अशी होणार प्रक्रिया
पोलिस शिपाई १७१, वाहनचालक ७३ जागेसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मैदानी चाचणी नंतर लेखी परीक्षा होणार आहे. टप्प्याटप्प्यात चाचणी होत आहे.
चहा कॅन्टीनची सोय
उमेदवारांसाठी मैदाना बाहेर फळे, चहा, बिस्कीट, नाश्ता विक्रीची सोय करण्यात आली आहे. कोणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून ही सोय होती. आरोग्य पथकही नेमले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.