आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलीस धावणार:मेडलसाठी पोलिस धावताहेत रोज 10 किमी

सोलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेडल जिंकण्यासाठी पोलीस धावणार आहेत दहा किलोमीटर अंतर. १४ ऑगस्ट रोजी ही स्पर्धा सोलापुरात होणार आहे. शहर पोलीस दलातील ४०० पोलिस सहभागी होणार आहेत. महिला गटात तीन व पुरुष गटात तीन याप्रमाणे सहा विजेते ठरणार आहेत. या स्पर्धाची तयारी करण्यासाठी दररोज पोलिस अधिकारी, कर्मचारी धावण्याचा सराव करीत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती वेल्फेअरचे पोलिस निरीक्षक शिवशंकर बोंदर यांनी दिली. पोलिस स्पर्धेची तयारी करत आहेत. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून विजेत्यांना खास मेडल आले आहेत. धावण्याचा सराव करताना पोलिस कर्मचारी.

अमृत महोत्सवातील उपक्रम
५ हजार तिरंगा झेंडा पोलिस व परिवाराला वाटप करणार
दौड कार्यक्रम आयोजन
पोलिस ठाणे अंतर्गत जातीय सलोखा कार्यक्रम वृक्षारोपण
शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना जनजागृती समाजमाध्यम, सायबर सेल बाबत जनजागृती
पोलिस ठाण्यात प्रत्येक नागरिकाला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे
महिला, तरुणी, ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवाद
पोलिस बँड पथकासोबत विविध ठिकाणी हर घर झेंडा उपक्रम जनजागृती
आजादी का अमृतमहोत्सव १४ ऑगस्ट रोजी दौड

बातम्या आणखी आहेत...