आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या बाजारात धान्य विक्रीला:काळ्या बाजाराच्या संशयावरून पोलिसांनी गहू, तांदूळ पकडला

साेलापूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळ्या बाजारात धान्य विक्रीला जात असल्याच्या संशयावरून पाेलिसांनी गहू आणि तांदूळ मंगळवारी रात्री पकडला. याबाबत अन्नपुरवठा विभागाच्या वतीने गुरुवारी पंचनामा करण्याचे काम सुरू हाेते. पंचनामा झाल्यानंतर, धान्य तपासणीचा अहवाल आल्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती एमआयडीसी पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक राजन माने यांनी दिली.

अक्कलकाेट राेड एमआयडीसी आकाशवाणी केंद्रासमाेरील परिसरात एका गोदामात धान्य ठेवले जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. पाेलिसांनी तेथून दाेन टिप्पर (एमएच २४ ए टी ३६०१ आणि एमएच १३, सीटी ६९५१) भरून गहू आणि तांदूळ ताब्यात घेतले. ते शासकीय धान्य काळ्या बाजारात घेऊन जात असल्याचा संशय पाेलिसांना आला. पंचनाम्यासाठी पाेलिसांनी अन्न पुरवठा विभागाला संपर्क साधला तेव्हा या विभागाकडून मंडल अधिकारी गवळी आले. बुधवारी आणि गुरुवारी या धान्याचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती. पंचनामा आणि धान्य तपासणी अहवाल आल्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...