आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:गरीबाची परस्थिती गरीबच समजतात; पापरी येथील शेतमजूर, शेतकरी, वाहन चालक यांनी केलेल्या बचतीतुन मोहोळ येथील गरजुना किराणा मालाची मदत

पापरी3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • लॉक डाऊनमुळे गोरगरीब, हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे

सम्मेद शहा गरजू व गोरगरीब नागरिकांना पापरीच्या हिंदवी पुरुष बचतगटामार्फत किराणा मालाची मदत देण्यात आली. पुरुष बचत गटातील सदस्य शेतकरी, वाहन चालक,शेतमजूर आदि कामे करणारे असूनही समाजाप्रती उत्तरदायित्व जपले आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनने सर्वत्र मजूर, कष्टकरी, बेघर यांना रोजगार गमवावा लागला आहे, मोहोळ येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह व नागनाथ विद्यालय येथे परराज्यातील कामगार, कुटुंबे, मुक्कामी आहेत, या बिकट परस्थितीत त्यांच्यावर उपासमारीची वेळ येवू नये म्हणून या गरजू नागरिकांना प्रापंचीक व जीवनावश्यक स्वरूपाचे सहाय्य म्हणून पापरी येथील हिंदवी पुरुष बचत गटाच्या सदस्यांनी आपल्या केलेल्या बचती मधून किराणा मालाचे एक कापड़ी पिशवीचे ११ प्रकारचे साहित्य असलेले  ४० किट तयार करून ते मोहोळ तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याकडे सुपुर्द केले आहेत. या किट मधे साखर,चहा पुडा, तुर डाळ,तांदूळ, बिस्किट पुड़े, गोडे तेल पिशवी,शेंगदाने,मीठ पुडा, पोहे, अंगाचे साबण,आदी मालाचा समावेश आहे. यावेळी बचत गटाचे सदस्य पिंटू गायकवाड़, दशरथ डोंगरे, गणेश फराटे, अमोल टेकळे,विकास वाघमारे, पवन शिंदे,आदि सदस्य उपस्थित होते. सध्या लॉक डाऊनमुळे गोरगरीब, हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे, त्यांची उपासमारी होवू नये यासाठी आम्ही खारिचा वाटा म्हणून केलेल्या बचतीमधून १५हजार रूपयांचे  किराणा मालाचे साहित्य घेवून एक किट बनवून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. -पिंटू गायकवाड़ अध्यक्ष(हिंदवी पुरुष बचत गट)

बातम्या आणखी आहेत...