आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर खड्डे:आसरा पुलावरील रस्त्याचा पहिला थर उखडल्याने खड्डे

सोलापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसरा चौक ते डी. मार्टपर्यंतचा रस्त्याचा पहिला लेअर करण्यात आला. त्यानंतर आठ दिवसांत पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर पुन्हा खड्डे पडत चालले आहेत. मागील तीन दिवसांपूर्वी एक खड्डा पडला. तो खड्डा मोठा होत असून, त्यांच्या बाजूस पुन्हा दुसरा खड्डा पडला आहे.

यामुळे रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. रस्ता पूर्ण झाला नसला तरी सात दिवसांत खड्डा कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सात रस्ता ते महावीर चौक, नवीवेस पोलिस चौकी ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक या रस्त्याचे प्राथमिक काम पावसात करण्यात आले. रस्ते करण्यासाठी माजी आमदार दिलीप माने यांनी आंदोलन केले होते.

पुन्हा करावा लागेल
पावसामुळे त्या रस्त्यावर खड्डे पडले असतील. पाऊस थांबला की पुन्हा तो रस्ता करणे आहे. त्यावेळी खड्डा बुजवून रस्ता करतील आणि करावे लागेल.''
दिलीप माने, माजी आमदार

बातम्या आणखी आहेत...