आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्काराचे वितरण:सामर्थ्यवान स्त्रिया सिद्ध करतात कर्तृत्व

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निरपेक्षपणे समाजाला काहीतरी देण्याची वृत्ती जोपासण्याची आज नितांत गरज आहे. त्यातून अनेक सामाजिक प्रश्न सुटतील. स्त्रियांमध्ये खूप कार्यक्षमता असते. त्यामुळेच स्त्रियांनी स्वतःच्या सामर्थ्यावर विविध क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन डॉ. माधवी रायते यांनी केले.

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर नऊ महिलांना “नारीशक्ती” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आनंदश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. माधवी रायते बोलत होत्या. या वेळी महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन महासंघाचे संचालिका सोनाली जाधव-मस्के, नेत्ररोगतज्ञ डॉ. तन्वंगी जोग, उद्योजिका सायली जवळकोटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता पाटील उपस्थित होते. संस्थापक महेश कासट यांनी प्रास्ताविक केले.

अक्षता कासट यानी सूत्रसंचालन केले. गणेश येळमेली यांनी अाभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारती जवळे, सुजाता सक्करगी, अर्चना बंडगर, सारिका मदने, मयुर गवते, केशव भय्या, संतोष अलंकुटे, श्रीपाद सुत्रावे, मंगेश कुलकर्णी, अभिजीत होनकळस, राहुल बिराजदार, जगदीश पाटील, प्रा. गणेश लेंगरे, प्रकाश आळंगे, सौरभ करकमकर आदींनी परिश्रम घेतले.

यांचा झाला सन्मान!
सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील, रेल्वे डीआरएम मुख्य कार्यालय अधीक्षक सविता जाधव, भागाईवाडीच्या माजी सरपंच कविता घोडके-पाटील, ज्वेलरी उद्योजिका स्मिता देशपांडे, डाॅ. सारिका होमकर, रियल इस्टेट कन्सल्टंट अंजली मालाणी-भाटे, मासाई चाटला, मनीषा डागा, लक्ष्मी आरगी आदी महिलांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

बातम्या आणखी आहेत...