आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:संजवाड येथील सोसायटी चेअरमनपदी प्रकाश पाटील

दक्षिण सोलापूर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजवाड विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी प्रकाश सूर्यकांत पाटील यांची तर व्हाइस चेअरमनपदी रावसाहेब बुळगुंडे यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी नूतन संचालक उदयकुमार सूर्यकांत पाटील, आनंदराव शिवलिंग बिराजदार, काशिनाथ शिवगोंडा बाके, सोमनिंग सदाशिव बुळगुंडे, लक्ष्मण शिवलिंग पाटील व कन्नव्वा सिद्धाराम बंडगर, लक्ष्मीबाई चंद्रकांत जमादार, निर्मला शरणाप्पा बिराजदार, विठ्ठल शिवशरण व वल्ली आत्तार उपस्थित होते. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अमोगसिद्ध महाराज, बाजीराव बुळगुंडे, महेश पाटील, सिद्धाप्पा वडरे, अमिन विजापुरे, बाबू वरशेट्टी, नाना पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. सोसायटीच्या निवडणुकीत जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे समर्थक उदयकुमार पाटील यांच्या पॅनेलने सर्व जागा जिंकल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...