आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:प्रणितींचा प्रचार : 8 पैकी 6 जागी काँग्रेस, कर्नाटक विधानसभा निवडणूकीत प्रतिष्ठा पणाला

सोलापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व भाजपने प्रतिष्ठा पणाला लावत प्रचाराची यंत्रणा लावली. त्यात सोलापुरातील काँग्रेस आणि भाजपचे आमदार कर्नाटकात प्रचारासाठी गेले. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे दावणगिरी येथील जबाबदारी होती. तेथे ८ पैकी ६ जागांवर काँग्रेसला यश मिळाले. यामुळे आ. शिंदे यांचा आगामी प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

दावणगिरी येथे आमदार शिंदे यांना मानणारा वर्ग नसला तरी तेथील कार्यकर्त्यांना दिलेले पाठबळ कामी आले. बेळगाव येथील शिंदे यांचा प्रचार चर्चेत राहिला. तेथेही यश मिळाले आहे. यापूर्वी शिंदे यांनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला होता. बाळीवेस येथील चौकात कांॅग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक विजयाचा जल्लोष केला.

विजय देशमुख ३ पैकी १, सुभाष बापूंना एका जागी यश

आमदार विजय देशमुख यांनी बैलहुंगल, विजयपूर आणि कलबुर्गी येथे प्रचार केला. यापैकी विजयपूर येथील जागा भाजपने राखली. देशमुख यांच्याकडे कन्नड व लिंगायत समाजाचे नेते म्हणून पाहिले जाते. बेळगावात सुभाष देशमुख यांच्याकडे बेळगावमधील एका विधानसभेची जबाबदारी होती. ती जागा भाजपने राखली.