आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेतील सावळा गोंधळ सुरूच आहे. या गोंधळाच्या मालिकेत एमए उर्दूची भर पडली. परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना चक्क हस्तलिखित आणि उत्तराच्या खुणा असलेली प्रश्नपत्रिका देण्यात आली. एमए उर्दू विषय विद्यापीठ अधिविभागातील भाषा संकुलात आहे. यासाठी वीस विद्यार्थी आहेत.पहिली-दुसरीतील विद्यार्थ्यांसाठीही आजकाल हाताने लिहिलेली प्रश्नपत्रिका देत नाहीत. हे तर विद्यापीठ आहे. परीक्षा विभागात यासाठी टायपिंग व्यवस्था असते. प्रशिक्षित मनुष्यबळ असते. यासाठी निधीही असतो. पण हस्तलिखित प्रश्नपत्रिका काढण्याचा हा प्रकार सोलापूर विद्यापीठाने रूढ करून टाकला. जशा एमएस्सी गणिताच्या प्रश्नपत्रिका हस्तलिखित होत्या. तशाच एमए उर्दूच्या प्रश्नपत्रिकाही हस्तलिखितच आहेत. प्रश्नपत्रिकेवरच बरेाबर उत्तरासाठीच्या खुणा असल्याचा हा प्रकार नर्सरी, पहिली दुसरीतील मुलांसाठी नाही, विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी परीक्षेच्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेत घडला. अभ्यास करून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकाराचा किती मनस्ताप होत असणार, याचा विचार करणार कोण?
कडक कारवाई करणार ^प्रश्नपत्रिकेवर आधीच खुणा असलेला पेपर विद्यार्थ्यांना सोडवण्यात देण्यात आलेल्या या प्रकाराची गंभीर दखल विद्यापीठाने घेतली आहे. हा अत्यंत चुकीचा प्रकार आहे. कडक कारवाई करत आहोत.’’ - डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ
चुकांची जबाबदारी घ्यावी ^विद्यापीठाच्या परीक्षा गोंधळाची मालिकाच सुरू आहे. यात दखल घेत सातत्याने होत असलेल्या या कारभाराबाबत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईसाठी पाठपुरावा करीत आहे. विद्यापीठानेही वारंवार होणाऱ्या चुका टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी. - प्रणिती शिंदे, आमदार.
गोंधळाची मालिका सुरूच १४ जुलैपासून सुरू झालेल्या परीक्षेत गोंधळ सुरूच आहे. एनटीसीच्या मायक्रोवेव्ह विषयाच्या आदर्श उत्तरपत्रिकेत २४ उत्तरे चुकीची, एमएस्सी गणित प्रश्नपत्रिकेत गोंधळ, विद्यापीठातच एमए, एमएस्सी, बीए मराठीला जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका, बीएस्सी गणितसाठी हस्तलिखित प्रश्नपत्रिका,सिव्हिल अभियांत्रिकीच्या पेव्हमेंट विषयाची प्रश्नपत्रिका काढली नसल्याचे ऐन परीक्षेत लक्षात आले. अभियांत्रिकीच्या आयटी विषयाची प्रश्नपत्रिका पर्यायाशिवाय मिळाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.