आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यासाठी दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) घेतली जाते.
गेल्या वर्षी 31 जुलै 2022 ला घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल अखेर जाहीर झाला. सोलापुरातील इयत्ता पाचवीसाठी 645, आठवीच्या वर्गातील 611 मुलं शिष्यवृत्तीसाठी पात्र झाली आहेत. जिल्ह्यातून एकुण 31 हजार 565 जणांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी प्रत्यक्षात 30 हजार 751 जण परीक्षेला उपस्थित होते. सोलापूरसह राज्यभरातून 29 हजार 171 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.
परीक्षा परिषदेतर्फे गेल्या वर्षी झालेल्या परीक्षेचा अंतरिम निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला. या परीक्षेस पाचवीचे 23.90 टक्के तर आठवीचे 12.54 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. गुणपडताळणीनंतर अंतरिम निकालच अंतिम ठरला आहे. जिल्ह्यात पाचवीसाठी 19 हजार 777 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 18 हजार 499 विद्यार्थी परीक्षेला हजर होते. तर आठवीसाठी 13 हजार 069 विद्यार्थ्यांपैकी 12 हजार 252 विद्यार्थी परीक्षेला हजर राहिले.
एकूण 31 हजार 565 पैकी 30 हजार 571 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला उपस्थित होते. इयत्ता पाचवीसाठी 645 तर आठवीसाठी 611 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेत. अंतिम निकाल जाहीर झाला असून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या www.mscepune.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र प्रथमच कोविडनंतर पुन्हा एकदा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.