आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान मुलांना अभिनयाचे प्रशिक्षण:मुलांना अभिनय शिकवण्यासाठी पुढे आले प्रिसिजन अन् गिल्लो

सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये लहान मुलांना अभिनयाचे प्रशिक्षण देता यावे यासाठी मुंबईच्या गिल्लो फाउंडेशन आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची माहिती शैली सथ्यू यांनी दिली.

सोलापुरातील तरुण रंगकर्मी आणि ज्येष्ठ रंगकर्मी यांना एकत्र घेऊन विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याचे नियोजन करण्यासाठी प्राथमिक स्तरावरील बैठक लोकमंगल कला मंच सभागृहात संपन्न झाली. यावेळी डॉ. मीरा शेंडगे, मळसिद्ध देशमुख, शोभा बोल्ली, माधव देशपांडे, शिरीष देखणे आदी उपस्थित होते. यावेळी सोलापुरातील रंगकर्मींच्या शैलीबद्दल सकारात्मक चर्चा झाली. आता २५ निवडक शाळांमध्ये बालनाट्य बसवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...