आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी तिकिटात सवलत‎ महिलांसाठी आनंददायी‎‎:लेकींकडे आणि देवदर्शनास प्राधान्य,‎ पन्नाशीपुढील महिला घेताहेत सन्मान‎

सोलापूर‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पन्नाशीच्या वरील वयोगट‎ असणाऱ्या महिला महाराष्ट्र‎ सरकारच्या महिला सन्मान‎ योजनेचा सन्मान घेत असल्याचे‎ सर्वसाधारण चित्र शनिवारी‎ पाहावयास मिळाले. एसटी बस‎ तिकिटात महिलांना ५० टक्के‎ सवलत देण्याची योजना‎ शुक्रवारपासून अमलात आली.‎ राज्यभरात याचे मोठ्या प्रमाणावर‎ स्वागत झाले. पन्नाशीच्या वरील‎ महिला देवदर्शन, लेकीच्या घरी‎ जाणे आदी आनंददायी कार्यासाठी‎ प्रवास करत असल्याचे दिसल्या.‎

परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्यात या‎ योजनेला अधिक प्रतिसाद मिळेल.‎ मुंबई, पुण्याला आणि नाशिक, नगर,‎ छत्रपती संभाजीनगर अशा शहरांना‎ जाण्यासाठी महिला उत्सुक‎ असतील, अशी अपेक्षा एसटी‎ प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व्यक्त‎ केली. महिला सन्मान योजनेचे‎ स्वागत करण्यासाठी शिवसेनेने‎ मोठा फलक सोलापूर एसटी‎ आगारामध्ये लावत महाराष्ट्र‎ शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले.‎

अर्ध्या तिकिटात‎ ‎
मी ‎मोहोळवरून‎ सोलापूरला‎ अर्ध्या तिकिटात‎ आले. पैसे कमी‎ घेतल्यामुळे खूप‎ आनंद झाला. आता पोरीबाळींकडे‎ जायला-यायला सोपे झाले. शिवाय‎ उन्हाळ्यात देवा-धर्माचे दर्शन‎ घेण्याकरता प्रवास होईल.- लक्ष्मी भोसले, प्रवासी आजी‎

बातम्या आणखी आहेत...