आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:रोजगार मेळाव्यात झाली 168 ‎ उमेदवारांची प्राथमिक निवड‎

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग‎ आणि शिवाजी महाविद्यालय बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने‎ पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे‎ आयोजन केले होते. त्यामध्ये १६८ जणांची निवड करण्यात‎ आली.यामध्ये २१० उद्योजकांमार्फत प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे‎ उमेदवारांची प्राथमिक निवड केली आहे.‎ हा मेळावा शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथे आयोजित केला‎ होता. या मेळाव्यात औद्योगिक परिसरातील उद्योजकांनी सहभाग‎ घेतला होता. त्यांच्याकडून एकूण १ हजार ४३५ पेक्षा जास्त रिक्त‎ पद कळवण्यात आलेली होती.

ही सर्व रिक्त पदे किमान दहावी,‎ बारावी, पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, बी.एसी, एम.एसी,‎ बँकींग, ट्रेनी, मार्केटिंग, मशिन ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर,‎ फिटर, अकाऊटंट, ऑपरेटर अशा विविध पात्रता धारक‎ उमेदवारांसाठी होती.‎ जिल्हयातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना या‎ रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी‎ उपलब्ध करुन देण्यात आलेल्या होत्या. रोजगार मेळाव्यात २८५‎ नोकरी इच्छुक उमेदवारांनी आपला सहभाग नोंदवला होता. असे‎ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त‎ जाधव यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...