आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेनंतर पुरुषांप्रमाणे महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती प्रतिवर्षी घेणार, असे ताराराणी कुस्ती केंद्राच्या अध्यक्षा शीतलदेवी मोहिते-पाटील "दिव्य मराठी"शी बोलत होत्या. ‘गेल्या १० वर्षांपासून महिला सबलीकरणासाठी "डॉटर्स मॉम फाउंडेशन" ही सामाजिक संस्था त्या चालवतेय.
सात वर्षांपूर्वीची घटना. जिल्हा परिषद सदस्य असताना सत्कार समारंभासाठी गेले होते. एक सोलापूरची मल्ल कोल्हापूरला सराव करते. तेव्हा कल्पना सुचली अन् ठरवले. प्रत्यक्षात चार वर्षांपूर्वी ताराराणी कुस्ती केंद्राची स्थापना ग्रीन फिंगर्स स्कूलमध्ये केली. अर्जुन पुरस्कार विजेत्या कौसल्या वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली याचा श्रीगणेशा केला.
एवढ्यावर मी थांबले नाही. कुस्तीची खाण असलेल्या हरियाणात सुहास तरंगे यांना पाठवून त्यांना प्रशिक्षण दिले. ते आणि हरियाणाचे सतपाल सिंग हे सध्या येथे मुलींना प्रशिक्षण देत आहेत. सध्या राज्यातील १०० मुलींचा शिक्षण, निवास व खुराकाचा सर्व खर्च केंद्र करत आहे. त्यांच्या इच्छेनुसार इंग्लिश मीडियममध्ये त्यांना शिक्षण दिले जात आहे. आता यश मिळायला सुरुवात झाली. आमची रोशनी राष्ट्रीय भरारी मारताना अभ्यासातही अव्वल आली.’
महिलांना नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न पुरुषांप्रमाणे महिलांची प्रतिवर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. परंतु अद्यापपर्यंत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडेकडून यास मूर्त स्वरुप मिळाले नाही. आता महिला मल्लांनाही पुरुषांप्रमाणे शासनाने सेवेत सामावून घ्यावे, यासाठी त्यांचा राज्य शासनाकडे तगादा राहील.
स्पर्धेला आंतरराष्ट्रीय लूक सद्या सुरू असलेल्या निमंत्रित राष्ट्रीय स्पर्धेस आंतरराष्ट्रीय लूक आला आहे. १५, १७ वर्षांखालील आणि खुला अशा ९०० मल्लांचा यात सहभाग आहे. तीन मॅट, इलेक्ट्रॉनिक गुणफलक, चारी बाजूने भव्य प्रेक्षक गॅलरी, महिलांसाठी स्वतंत्र गॅलरी, १००० जणांच्या सर्व व्यवस्थेसाठी आणि अडचणीसाठी ५०० स्वयंसेवकांचा चमू. सर्व समिती प्रमुखांना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी वॉकी टॉकी. तसेच रोज मल्लांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानीही आहे.
महिलांना नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न
पुरुषांप्रमाणे महिलांची प्रतिवर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. परंतु अद्यापपर्यंत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडेकडून यास मूर्त स्वरुप मिळाले नाही. आता महिला मल्लांनाही पुरुषांप्रमाणे शासनाने सेवेत सामावून घ्यावे, यासाठी त्यांचा राज्य शासनाकडे तगादा राहील. शीतलदेवी मोहिते
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.