आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चासत्र आयोजन:बार कौन्सिलचे थोबडे पुन्हा अध्यक्ष ; कल्याणकारी योजना राबवल्या

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र - गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी अॅड. मिलिंद थोबडे यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी २०११ मध्ये त्यांनी हे पद भूषवले होते. दुसऱ्यांदा त्यांची निवड झाली. १९८३ पासून अॅड. थोबडे हे पदवीनंतर या क्षेत्रात कार्यरत आहेत. २०१० मध्ये बार कौन्सिलची निवडणूक लढवली. सर्वाधिक पसंतीच्या मतांनी निवडून आले. २०११ मध्ये त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली होती. २००५ मध्ये ते जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष तर २०१९ मध्ये बार कौन्सिल सदस्यपदी निवडून आले होते. अॅड. विवेकानंद घाटगे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

अल्पदरात दिले लॅपटॉप
वकील व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विमा योजना, नवोदितांना कायदेविषयक प्रशिक्षण शिबिर, वकिलांना न्यायाधीश होण्यासाठी प्रशिक्षण शिबिर, कायदेविषयक चर्चासत्र आयोजन, कायद्याची अद्ययावत माहिती देणारे सॉफ्टवेअर व अल्पदरात लॅपटॉप उपलब्ध करून दिले. वैद्यकीय बिलांचा परतावा देणे, मृत वकिलांच्या वारसांना आर्थिक सहाय्य अशा अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...