आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Pretend To Be A PSI After Falling In Love With A Young Woman Who Came For Police Recruitment! The Truth Came Out That Marriage Was About To Take Place! Now In Prison

भामट्या PSI ला अटक:पोलिस भरतीसाठी आलेल्या तरुणीच्या प्रेमात पडल्यानंतर केला PSI असल्याचा बनाव! लग्न होणारच होते की समोर आले सत्य! आता तुरुंगात

मंगळवेढा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेम हे आंधळे असते हे अगदी खरे आहे. लग्न करण्यासाठी तरूणींना प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकवून तरूण काय करतील याचा नेम नाही. सोलापुर जिह्याच्या मंगळवेढा येथील एका तरूणाने लग्नासाठी तर हद्दच पार केली. एका तरूणीला प्रेमाचे अमिष दाखवून तिला स्वत:च्या जाळ्यात अडकवले. इतकच नाही तर मी एक पीएसआय आहे असा खोटा तगादा लावला. माझे वडिल देखील आयपीएस आहेत असे देखील त्या तरूणाने सांगितले. तरूणीचा काही काळ या मुलावर विश्वास बसला. मात्र या तरूणीला संशय आल्याने हा सगळा प्रकार तिने पोलिसांना सांगितला. तसेच हा सगळा खोटा प्रकार समोर येताच या तरूणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रमेश भोसले असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढा येथील रहिवासी आहे. परंतु तरुणीच्या आणि तिच्या नातेवाईकांच्या सतर्कतेमुळे भामटा पीएसआय रमेश भोसलेचा हा प्रयत्न मात्र फसला. पोलिसांनी त्यांची खेळी रचून या आरोपीला अटक केली आहे.

अशी झाली ओळख
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथे राहणारी तरूणी पोलिस भरतीसाठी आली होती. तिथे आरोपी रमेश भोसले या व्यक्तीशी तिची ओळख झाली. मंगळवेढा पोलिस ठाण्यात मी पीएयआय च्या पदावर कार्यरत आहे. अशी खोटी माहिती तरूण पिडितेच्या आई-वदिलांना दिली. तरूणी सोबत अधिक जवळीक करून तिला लग्नाची मागणी देखील घातली.

दरम्यान तरुणीला आरोपीवर संशय आल्याने तिने व तिच्या आई वडिलांनी मंगळवेढा आणि पंढरपूर पोलीस ठाण्यात याबाबत चौकशी केली. तेव्हा या नावाचा कोणताच कार्यकारी आमच्या कडे नाही हे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या खोट्या प्रकरणी रमेश भोसले याला पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून पोलीस दलाचा खाकी गणवेश, टोपी, बेल्ट आणि मुंबई पोलीस नावाने तयार केलेले खोटे ओळखपत्र असा ऐवज पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बातम्या आणखी आहेत...