आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:धूळ आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांपासून मास्क करतो बचाव; मास्क आरोग्यदायीच, संसर्गांना होतो अटकाव

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारी आटोक्यात आली तरीही येणारा काळ हा चांगलाच राहील याची आज खात्री देता येणार नाही. त्यातच सोलापूर शहरात धुळीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे श्वसनाचे विविध आजार जडण्यापेक्षा, त्यापासून दूर राहण्यासाठी तोंडाला मास्क लावणे खूपच फायदेशीर आहे. यामुळे एकमेकांना आजारांचे संक्रमण होणार नाही. कोरोनाचे निर्बंध पूर्ण हटवल्यामुळे बाजारपेठेत तसेच रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. दुसरीकडे कोरोनाचे रुग्णही सापडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहणे आणि स्वतःची काळजी घेणे अत्यावश्‍यक आहे. त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तोंडाला मास्क लावणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.

मधुमेह, रक्तदाब असणाऱ्यांनाही मास्क फायद्याचा
कोरोना कमी झालेला आहे. मात्र साथीची तीव्रता कमी झालेली नाही. आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी मास्क गरजेचा आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे चांगलेच आहे. काही जणांना धुळीची अॅलर्जी आहे. त्यांना मास्क वापरल्यानंतर सर्दी, खोकला कमी प्रमाणात झाला आहे. जंतू व विषाणूपासून संरक्षण होण्यास मदत होते. वयोवृद्ध, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आहे अशा रुग्णांनी मास्कचा वापर केला पाहिजे. डॉ. श्रीकांत पागे, फिजिशियन गर्दीमध्ये विविध आजारांचे लोक असू शकतात. त्यांच्यापासून इतरही आजार जडू शकतात. ताप, सर्दी व खोकला असलेल्या नागरिकांनी घरातही मास्क वापरला पाहिजे. असे केल्याने व्हायरल इन्फेक्शन होणार नाही. मास्क परिधान केलेले असल्यामुळे श्वसनाचे विकार जडत नाहीत. मास्क लावल्यामुळे अनेकांना धुळीपासून होणारा त्रास कमी झाला आहे. डॉ. जयंत बच्चुवार, फिजिशियन

मास्क असणे गरजेचे अन् अत्यावश्यकही
तोंडाला मास्क लावण्याचे कल्चर चांगले आहे, ते तसेच ठेवावे. जपानमध्ये मास्क क्लचर असल्यामुळे कोरोनासारख्या आजारावर तत्काळ मात करू शकले. श्वसनाद्वारे होणारे संक्रमण रोखण्यास मास्कमुळे मदत होते. संसर्गजन्य आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. प्रदूषण, अॅलर्जीपासून बचाव होण्यास मदत होते. टीबीचा फैलाव कमी होण्यास मास्कची मदत झाली आहे. मास्क लावल्यामुळे खोकणाऱ्या व्यक्तीपासून संक्रमण होत नाही. कोरोनामुळे लागलेली मास्क लावण्याची सवय चांगली आहे. कोरोना पूर्णपणे कमी झालेला नाही. विविध व्हेरिएंट येत आहेत. त्यामुळे मास्क ऐच्छिक केला असला तरी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावलेला चांगलाच आहे. एखादा आपल्या आजूबाजूला कोरोनाचा वाहक असू शकतो. अशा वेळी मास्क आपले संरक्षण करत असल्यामुळे तोंडाला मास्क असणे गरजेचेच नव्हे तर अत्यावश्यक आहे. डॉ. राहुल देशपांडे, फिजिशियन

बातम्या आणखी आहेत...