आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा“अडचणीच्या काळात तुम्ही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवली. भगवा फडकवणाऱ्या आपल्यासारख्या शिवसैनिकांचा मला खूप अभिमान आहे. यापुढील काळामध्ये जोमाने काम करा, झेडपी, पंचायत समितीसह विधानसभेत असाच भगवा फडकवा,’ अशी शाबासकी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चिंचपूर (ता. दक्षिण सोलापूर) ग्रामपंचायतींच्या सदस्यांना दिली.
शुक्रवारी जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चिंचपूर (ता. दक्षिण सोलापूर) ग्रामपंचायतीचे सर्व सातही सदस्य जिंकत शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या गटाने एकतर्फी विजय मिळवला. माजी सहकारमंत्री भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या गटाचा शिवसेनेच्या ठाकरे गटाने सुपडा साफ केला.
निकालानंतर सर्व सदस्यांसह शिवसेनेचे नेते अमर पाटील मुंबईला गेले. रात्री पुण्यामध्ये मुक्काम करून शनिवारी (६ ऑगस्ट) दुपारी १ वाजता थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट दिली. या वेळी त्यांच्यासोबत, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, महिला आघाडीच्या संजना घाडी, योगिराज पाटील, धर्मराज बगले, माजी सरपंच शरण पाटील उपस्थित होते.
मातोश्रीवर विजयाचा केला जल्लोष : पाटील
ग्रामपंचायत निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवल्यानंतर आम्ही सर्व सदस्यांसह थेट मातोश्रीकडे निघालो. उद्धव ठाकरे यांनी सर्व नूतन सदस्यांचा भगवे उपरणे घालून सत्कार केल्यानंतर त्याच ठिकाणी आम्ही विजयाचा जल्लोष केला. तसेच, पुढील निवडणुकांमध्ये यश मिळवण्याचा संकल्पही केला. उद्धव साहेबांनी माझ्या कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली, वडिलांच्या तब्येतीबाबत विचारणा केली. शिवसेनेची ताकद वाढवा, असे म्हणून पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.
- अमर पाटील, शिवसेना नेते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.