आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना काळात प्रजनन व बाल आरोग्य क्षेत्रात जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सोलापूर जिल्ह्याने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. याबद्दल जि.प.चे आरोग्य विभागाचे डॉ. अनिरुद्ध पिंपळे व डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला.
पुणे येथे यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी येथे राज्याच्या आरोग्य विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी व निवासी वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती. बैठकीत आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, व्हिडिओ कॉंन्फरन्सद्वारे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास व आयुक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान एन. रामास्वामी सहभागी झाले होते.
या सभेमध्ये सन २०२१- २०२२ या आर्थिक वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला. प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमात गडचिरोली प्रथम तर हिंगोली जिल्ह्याने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. सोलापूर जिल्ह्याने राज्यामध्ये तिसरा क्रमांक पटकावला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.