आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावीरांकडे 'प्राथमिक शिक्षण'ची जबाबदारी:जि. प. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. लोहारांचा पदभार सीईओ स्वामींनी काढला

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांचे पदभार मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी बुधवारी दि. 2 नोव्हेंबर रोजी काढून घेतले असून, आता प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याकडे सोपविले आहेत.

डॉ.लोहार यांना सोमवारी दि. 31 ऑक्टोबर रोजी 25 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लोहार यांना 25 हजार रुपये घेताना ही कारवाई केली होती. किरण लोहार यांच्यासोबत एका लिपिकाला पकडण्यात आले होते. 50 हजार रुपयांची लाच मागून तडजोडी अंती 25 हजार रुपये ठरले होते.

डॉ. किरण लोहार यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे शिक्षण खात्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. किरण लोहार यांच्यावर कारवाईसाठी शिक्षण उपसंचालक यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील एका खाजगी शाळेला 10 पर्यंत मान्यता देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी मागितली होती. मंगळवारी दुपारी किरण लोहार यांना कोर्टात हजर केले असता 3 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

तात्पुरता पदभार उपशिक्षणाधिकार्‍यांकडे

प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांवर कारवाई झाल्याने शिक्षण खात्यात एकच खळबळ उडाली आहे. मुख्य अधिकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्राथमिक शिक्षण खात्याची जबाबदारी उप शिक्षणाधिकारी संजय जावीर यांकडे दिला आहे. सध्या जावीर यांच्याकडे मनपा शिक्षण मंडळाचेही जबाबदारी आहे.

''31ऑक्टोबर रोजी 25000 रूपयांची लाच घेताना प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ किरण लोहार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लोहार यांच्यावर कारवाई सुरू असून जिल्हा परिषद प्रशासनाने महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 मधील नियम 3 चा भंग केल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) मधिल नियम 4 नुसार कारवाई करण्यात यावी असा अहवाल शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पाठवला असल्याची आहे.'' - दिलीप स्वामी, सीईओ जि. प. सोलापूर

बातम्या आणखी आहेत...